कारवाईमध्ये 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना । वार्ताहर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दि. 25 एप्रिल 2020 रोजी लोंढेवाडी शिवार नाल्या किनारी ता. जि. जालना येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर अचानकपणे छापा टाकला असता हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रीत रसायन 860 लिटर गावठी दारु 55 लिटर मिळुन आल्याने ते जप्त करण्यात येऊन गुळमिश्रीत रसायन व गावठी हातभट्टी दारु जागीच नष्ट करण्यत आली. तसेच अंबडरोडवर हातभट्टी गावठी दारु वाहतुक करीत असताना एक दुचाकी क्रमांक एम.एच 21 एच 5624 हीरो होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आली असुन एकुण 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन गुन्हे नोंद करुन एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई निरीक्षक सु.अ.गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, दुय्यम निरीक्षक अभय औटे, सुनिल कांबळे, देवीदास आडेप, ज्ञानेश्वर सांबारे यांनी केली. अवैध मद्यविक्री, वाहतूक यासंबंधी कुठलेही माहिती असल्यास दुरध्वनी क्रमांक 02482-225478 व 18008333333 या टोल फ्री नंबर तसेच 8422001133 या व्हाटसअप नंबर क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे
Leave a comment