आष्टी । वार्ताहर
राज्यात या वर्षी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी ऊस बागायतदार आज रोजी अडचणीत आलेला दिसतोय व 20- 21 च्या गळीत हंगामासाठी शेतकर्यांनी लावलेल्या उसाला आज रोजी खतांची अत्यन्त गरज असल्याने विभागातील शेतकर्यांनी आपल्या कारखान्याला नोंदी केलेल्या आहेत तसेच आमचे सर्कल मधील सर्व शेतकर्यांचे ऊस या वर्षी चांगल्या दर्जाचे असून खतांची अत्यन्त गरज असून आपल्या श्रद्धा एनर्जी अॅन्ड इफ्रा प्रा.एलटीडी मा.बागेश्वरी साखर कारखाना इफ्रा प्रा.एलटीडी परतूरकडून शेतकर्यांनी रासायनिक खत मिळावी अशी मागणी सावकार ग्रस्त शेतकरी समितीचे जिल्हा अध्यक्ष सिद्धेश्वर केकाण केली आहे.
यावेळी फुलवाडी गावचे सरपंच वाघमारे महादेव, गजानन लोणीकर उपसरपंच लोणी, प्रफुल शिंदे सरपंच आनंदगाव, सुरेश जगताप सरपंच पांडेपोखरी, ज्ञानेश्वर पवार सरपंच ढोकमाळ, निर्धास राठोड सरपंच हस्तूर तांडा, सीताराम राठोड सरपंच परतावाडी, परमेश्वर केकाण सरपंच रायगव्हाण, कृष्णा मोटे उपसरपंच पळशी, शिवदास पोटे उपसरपंच रायगव्हाण, माऊली सोळंके सरपंच अकोली, या सर्वांनी यावेळी शेतकर्यांच्या हितासाठी निवेदनाद्वारे रासायनिक खतांची मागणी केली आहे.
Leave a comment