ङ्गुल शेती करून ङ्गुलाच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील शेतकरी शंकर प्रभु सांगुळे अल्पभूधारक शेतकरी बारावीपर्यंत कसेबसे आई-वडिलांनी मोलमजुरी करून शिक्षण दिले व संसाराचा गाडा चालवला दोन एकर शेती सात जणांचे कुटुंब 30 गुंठ्यात ङ्गुल शेती करून कुंभार पिंपळगाव येथे ङ्गुलं विक्रीचा व्यवसाय करत दोन मुलं एक मुलगी पती-पत्नी आई-वडील सात जणांचे कुटुंब ङ्गुल शेती करून संसाराचा गाडा कसाबसा चालत यावर्षी 40 ते 50 हजार रुपये खर्च करून 30 गुंठ्यांमध्ये मोगरा ,गुलाब, शेवंती, गलांडा आधी प्रकारच्या ङ्गुलांची शेती केली होती. रात्रंदिवस कुटुंबासह मेहनत काबाडकष्ट करून ङ्गुलांची शेती चांगल्या प्रकारे बहरली होती साधारणता दोन 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत यावर्षी लग्नसराईत उत्पन्न होईल या अपेक्षेने कष्ट करत उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास वेळप्रसंगी टँकरचे पाणी देऊन पोटच्या लेकरा प्रमाणे ङ्गुलांच्या बगीच्याचे संगोपन केले जाते या वर्षी तर चांगले उत्पन्न होईल .या उत्पन्नातून मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे करू बरी -बुरी परिस्थिती निर्माण होईल . या ङ्गुलशेतीतून मिळालेल्या शिलकीच्या उत्पादनात छोटसं घर बांधू आई-वडिलांना आता काम करण्याची ची गरज भासू नये रात्रंदिवस काबाडकष्ट केले लोकांकडे मोलमजुरी करून आपला गरिबीचा संसार चालवला, आता त्यांना काम करू द्यायचे नाही. असे स्वप्न असे विचार सतत या युवक शेतकर्याने मनात ठेवले होते .परंतु समोर कोरोनाचे संकट उभे राहिले आणि आज अशी भयानक परिस्थिती बघता बघता निर्माण झाली एक महिना झाला ङ्गुलांची बागायती शेती उद्ध्वस्त होताना डोळ्यासमोर पहावेना असे झाले आहे. परंतु नाविलाज असल्याने आता ङ्गुलशेती पूर्ण उद्ध्वस्त होताना दिसत आहे परंतु केलेला खर्च सुद्धा निघू शकत नाही आता खर्च तर नाहीच पण मिळणारे उत्पन्न सुद्धा बुडाले मुलांना शिक्षण कसे द्यायचे कुटुंबाचा 5- 7 व्यक्तींचा गाडा चालवायचा कसा या युवक शेतकर्याला असा प्रश्न सतावत असून समोर कर्जाचा डोंगर दिसत आहे शासनाने आता अशा परिस्थितीत अल्पभुधारक शेतक-यांना जगण्यासाठी काहीतरी मदत देण्याची आता खरी गरज आहे अशी अशा ङ्गुलशेती-व्यावसायीक शेतकर्यांनी केली आहे.
Leave a comment