अकरा जणांकडून साडेपाच हजारांचा दंड वसूल।
जालना । वार्ताहर
नगर पालिकेच्या वतीने संपूर्ण जालना शहरात वेगवान पध्दतीने निर्जंतुकीकरण ङ्गवारणी मोहीम राबवली जात असून शनिवारी ( ता. 25) नूतन वसाहत भागात निर्जंतुकीकरण ङ्गवारणी मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण शहरात मास्क न लावता ङ्गिरणारे आणि सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणार्या 11 जणांकडून साडेपाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसर्या टप्प्यात शहरात ङ्गैलाव होऊ नये या करिता नगर पालिकेच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच नगराध्यक्षांच्या सूचनेवरून मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता विभागाने संपूर्ण शहरातील विविध भागांत निर्जंतुकीकरण ङ्गवारणी करण्यात येत असून मास्क न लावता ङ्गिरणार्यांना दंड ठोठावला.
शनिवारी (ता.25) नगरसेवक अरूण मगरे ,रविंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रं.27 मधील नूतन वसाहत,मम्मादेवी नगर,राहुल नगर शासकीय गोदाम परिसरात प्र. स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे,दङ्गेदार श्रावण सराटे, बाळू पवार,सागर गडकरी अविनाश साळवे यांनी मम्मादेवी नगर,शासकीय गोदाम परिसर,राहुल नगर,नूतन वसाहत भागात निर्जंतुकीकरण ङ्गवारणी केली .तसेच शहरात विविध ठिकाणी स्वच्छता निरिक्षक , सॅमसन कसबे, संजय खर्डेकर,आरूण वानखेडे,पंडित पवार,दङ्गेदार श्रावण सराटे, रविंद्र कल्याणी यांनी सहकार्यांसह ङ्गवारणी करतांना नूतन वसाहत, गांधी चमन, छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सोशल डिस्टन्स चे पालन न करता,मास्क लावून न ङ्गिरतांना आढळून आले. या प्रकरणी एकूण 11 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 5हजार 500 रू.दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी मास्क लावून बाहेर पडावे तसेच सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment