खुलताबाद । वार्ताहर
पंतप्रधान मोदींनी जेव्हा लॉक डाउनची घोषणा केली, त्यानंतर काही दिवसांनंतर गरीब लोकांसाठी अनेक मदत उपाय केले गेले. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचाही यात समावेश आहे. जर तुम्ही देखील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला तीन महीने विनामूल्य गॅस सिलिंडर मिळेल.
या योजनेंतर्गत लाभ देण्याची सर्व तयारी केल्यानंतर केंद्र सरकारने सिलिंडरचा पुरवठा देखील सुरू केला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात गैस सिलेंडर चे पैसे आगाऊ जमा करण्यात येत आहे. या योजनेत एक महिन्याला एकच सिलेंडर मिळेल. पहिल्या महिन्याचे सिलेंडर घेतल्यावरच दुसर्या महिन्याचे पैसे लाभार्थी च्या खात्यात जमा होतील. या पैशातून रोख पैसे देऊन आपण वितरका कडून सिलिंडर घेऊ शकता.या योजनेंतर्गत नोंदणीकृत लोकांनाच या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. याअनुषंगाने खुलताबाद येथील श्री सद्गुरु गैस एजेंसीत गैस सिलेंडर वाटप सुरु करण्यात आले असून, यासाठी लाभार्थीचा मोबाइल नंबर नोंदनिकृत असणे आवश्यक आहे. एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी किमान 21 दिवसांचे अंतर असावे. उज्ज्वला योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 14.2 किलोचे 3 सिलिंडर देण्यात येणार आहेत. 1 महिन्यात फक्त एक सिलिंडर विनामूल्य दिले जाईल. या विषयी अधिक माहितीसाठी श्री सद्गुरु गैस एजेंसी ला भेट द्यावी असे आवाहन व्यवस्थापक मंगेश मुळे यांनी केले आहे. यासोबतच ऑनलाईन बुकिंग करिता नंबर 9420423456 हा आहे तसेच कार्यालय संपर्क 02437-241887, 241212 व उज्ज्वला विषयी आधिक माहीतीकरिता 8888891883,9970328112, 8888879632 व मैकेनिक सर्विस करिता 8007175009 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर लॉकडाउन च्या काळात देखील आमचे कर्मचारी उत्तम सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. अशी माहिती एजंसी व्यवस्थापक मंगेश मुळे यांनी दिली आहे.यावेळी अनिल भालेराव, अशोक शेळके, समाधान कोतकर, नितिन वावधाने, हेमलता भावसार आदि उपस्थित होते.
Leave a comment