दूध विक्रेत्यांचे पेट्रोल अभावी दुध विक्री थांबली,हजारो लिटर दुध जाईल वाया
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेच्या पासेसच्या वेतीरिक्त गर्दी वाढताना दिसून येत आहे .गर्दी कशी वाढत आहे हा मात्र गंभीर प्रश्न आहे. रोजच्या रोज गर्दी वाढते,गर्दी वाढतेच कशी .....? कुंभार पिंपळगाव ग्रंथालयीन शहर बाजारपेठेचे गाव येथे येणारे दुध थांबले कुंभार पिंपळगाव एक ग्रामीण शहर असून येथे दोन दूध डेरी आहे .येथे परिसरातील 30 ते 40 खेडेगावातून विक्रीला येणारा दूध थांबले असून दूध व्यवसाय बंद पडले आहेत .दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे. कोरोना च्या नावावर पेडींचे भाव ,वाढले दुधाचे कमी झाले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत -वाढत -वाढतच असलेल्या भयानक आकडेवारीवरून नही लोकांमध्ये समज यायलाच तयार नाही शासनाने आजही पेट्रोल पंपावर लावलेल्या नियमाची लोकांमध्ये भीती नसल्याचे दिसून येत आहे त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पेट्रोल पंपावर तोबा गर्दी होत असून सोशल डिस्टन्सचा पंजा उडाला आहे.
पेट्रोल पंप चालकांची डोकेदुखी वाढत आहे. लॉकडाऊन, संचार बंदीच्या काळात शासनाने घातलेल्या नियमाची जनतेकडून अधिकारी-कर्मचारी अधिकार व्यावसायिकांकडून पायमल्ली होतांना स्पष्ट दिसत आहे. सोशल डिस्टंन्स चा अनेक ठिकाणी फजा उडाला असून अधिकारी असतानाही त्याना नियमाचे कोणालाच अविर्नेस दिसून येत नसल्याचे दिसत आहे .काही गैरवापर होत आहे एस.पी. कार्यालयाकडून मिळालेल्या किती पास कुंभार पिंपळगाव सर्कल मध्ये असतील आणि किती कोव्हीड 19 मध्ये काम करणार्या कर्मचार्यांची संख्या व अधिकार्यांच्या वाहनांची संख्या व व्यवसायिकांच्या पासेस असतील याचा ताळमेळ लावून आत्तापर्यंत नेहमीच पंपावर गर्दी होताना दिसून आली आहे .अत्यावश्यक सेवेचे एकूण किती वाहने असतील नेहमीच पंपा रोजच गर्दी तेवढीच दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा दूध विक्रेते, यांना रोजच्या किती किलोमीटरच्या प्रवासा दुध विक्रीसाठी करा्वा लागतो त्यानुसार पेट्रोल-डिझेल देण्यात यावे व त्यांना पास देऊन रोजच्या-रोज दुध विक्रेत्यांच्या पेट्रोलची नोंद व्हावी असे दूध विक्रेत्यांनी व परिसरातील शेतकरी भाजीविक्रेत्यां सह परिसरातील अत्यंत आवश्यक सेवा गुंज, मूर्ती धामणगाव, आरगडे गव्हाण, पिंपरखेड जांब समर्थ, घाणेगाव, कोठाळा, देवी देगाव, पाडोळी, लिंबोणी, साकळगाव, मासेगाव, नाथनगर, गणेश नगर, राजूरकर कोठा आदी गावासह परिसरातून आम्हाला पासेस द्या, आमचे दुध वाया जात आहे.आहे अशी मागणी भाजीपाला,दूध उत्पादक, शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांमधून जोर धरत आहे.
Leave a comment