बदनापूर । वार्ताहर
कोरोना संकटामुळे औरंगाबाद जालना ये जा करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना 21 एप्रिल पासून जालना हद्दीत प्रवेश बंद करण्यात आलेला असतांना देखील बदनापूर नगर पंचायत सी ओ व पंचायत समिती गट विकास अधिकार्यांसह एका लोकप्रतिनिधीला वरुडी चेक पोस्ट वरून प्रवेश देण्यात आला तर 21 एप्रिल रोजी रात्री देखिल अनेक अधिकारी औरंगाबाद ला गेल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांच्या आदेशाची उघडपणे पास्यमल्ली केली जात आहे. कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असतांना आणि औरंगाबाद व बुलढाणा जिल्हा रेड झोन मध्ये जाहीर झाल्याने जलनेकरांची चिंता वाढली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यत कर्तव्य बजावत असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी औरंगाबाद व बुलढाणा या रेड झोन जिल्ह्यातून येत असल्याने व जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हाबंदी आदेश लागू केलेला असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी 20 एप्रिल रोजी रात्री आदेश काढून औरंगाबाद जालना जिल्हा सीमेवर असलेल्या बदनापूर वरुडी चेक पोस्ट वरून जालना जिल्ह्यत प्रवेश करणार्या अधिकारी व कर्मसिगर्याना प्रवेश देऊ नये तसेच जालना हद्दीतून औरंगाबाद ला जाऊ देऊ नये असे आदेश दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांचे आदेश येताच 21 एप्रिल रोजी स्वतः पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, एस बी भागवत,शेख इब्राहिम,चरणसिंग बहमन्वत आदींनी चेक पोस्ट गाठून जवळपास दीडशे अधिकारी ,कर्मचार्यांची वाहने माघारी पाठविली तर तहसीलदार छाया पवार,संजय शिंदे,दिनेश राजपूत यांना प्रवेश देण्यात आला मात्र संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर पुन्हा हे अधिकारी औरंगाबाद ला निघून गेले त्यांना कोणीच अडविले नाही हे विशेष जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशामुळे अनेक पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच इतरांनी चांगलीच धास्ती घेतली मात्र 22 एप्रिल रोजी औरंगाबाद येथून ये जा करणार्या बदनापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे ह्या अचानक 12 वाजता अवतरल्या कोणत्या मार्गाने त्यांनी प्रवेश केला याचा पत्ता कोणालाच लागला नाही त्याच प्रमाणे पंचायत समिती गट विकास अधिकारी देखील आले एकंदरीत चेक पोस्ट ला हुलकावणी देत सदर अधिकाऱयांनी औरंगाबाद हुन बदनापूर हद्दीत प्रवेश केल्याने चांगलीच चर्चा रंगली तर आमदार नारायण कुचे हे औरंगाबाद येथून बदनापूर ला येत असतांना चेक पोस्ट वर अडविण्यात आले असता त्यांनी चूक झाली उद्या नाही येणार असे म्हणत विनंती केल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला. पासधारकांना त्रास -अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय मार्ङ्गत पासेस देण्यात आलेले असतांना देखील वरुडी चेक पोस्ट वर दूध वाल्यांना अडवून दमदाटी केली जात आहे तर ज्या अधिकारी,कर्मचार्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे अश्या लोकांना बिनधास्तपणे प्रवेश दिला जात असून अधिकारी कर्मचार्यांचे अप डाऊन थांबलेले नाही. शिवसिंग बहुरे- पोलीस उपनिरीक्षक -औरंगाबाद हुन जालना हद्दीत प्रवेश करण्यासाठी आलेल्या अनेक शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना माघारी पाठविले तर आमदार नारायण कुचे यांना देखील थांबविले होते व त्यांना उद्या यायचे असेल तर पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांची परवानगी घेऊन या अशी सूचना दिली तर बदनापूर शहरात कार्यरत असलेले औरंगाबाद येथुन ये जा करणारे काही अधिकारी कोणत्या मार्गाने बदनापूर ला पोहचले ते मला सांगता येणार नाही.
Leave a comment