पडद्यामागुन बातमीला रंग-रूप देणारे दुर्लक्षीतच!
जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहिर केले. समाजातील प्रत्येक घटक आर्थिक अडचणीत सापडला असून प्रिंट मीडीयातील संगणक चालकांपुढेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. दैनिकांमध्ये काम करतांना मिळणारा पगार, कुटुंबाचा उदरनिर्वाहर आणि सध्याच्या परिस्थितीमुळे संगणक चालकांना मदत करण्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. वर्तमान पत्राच्या कार्यालयामध्ये पडद्यामागून पानावरील प्रत्येक बातमीला रंग- रुप, लेआऊट, सजावट देण्याबरोबरच प्रत्येक शब्द न शब्द अचुक टाईप करणे अशी कामे संगणक चालक करतात, मात्र हा घटक नेहमीच वंचित राहिला आहे.
पडद्यामागचे कलाकार असल्याने संगणक चालकांकडे कोणीही लक्ष देत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे संगणक चालकही अडचणीत सापडले आहेत. घरातील सर्व व्यक्ती व्यवसाय बंद असल्याने घरातच आहेत. कुटुंबाचा पूर्ण भार संगणक चालकांवर आलेला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक घरात थांबलेला असतांना संगणक चालक मात्र ऑन ड्युटी आहेत. सध्या काही वर्तमान पत्रांची छपाई होत नसली तरी ऑनलाईन वृत्तपत्रांनाही तेवढीच मागणी आहे. यामध्येही संगणक चालकांची महत्वाची भुमिका आहे. नेहमी वंचित राहणार्या या घटकांकडे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि दानशुरांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे
Leave a comment