आष्टी प्रतिनिधी :
शासनाकडून लाँकडाऊन करण्यात आला व जिवनावश्यक वस्तु सोडता इतर सर्वच व्यवसाय सरकारने बंद केले,देशी वेदेशी दारुवर देखिल निर्बंद घातला मात्र पोलिसांना हुलकावणी देऊन सर्रासपणे हातभट्टी दारुची जोरात विक्री सुरु आहे. या विषयी सविस्तर माहीती अशी की,जवळपास तीन आठवड्यापासुन देशभरात लाँकडाऊन सुरू आहे,त्यातच शासनाने देशी विदेशी दारुच्या विक्रीवर कडक निर्बध घातले असल्याने मध्यपान करणार्या देशी विदेशी दारु प्रमींची समस्या आनखीनच वाढत गेली त्यामुळे या मध्यपी महाश्यांना नाईलाजाने गावठी हातभट्टी दारुकडे वळावे लागले म्हणुन हातभट्टी ची मांगणी वाढत गेली याचा फायदा घेत हातभट्टी व गावठी दारू विक्रेते जोमाने दारू विक्री करत असल्याचे चित्र आष्टीसह परिसरात पाहायला मिळत आहे पोलिस यंत्रना यावर लक्ष ठेऊन असली तरीही अध्याप पर्यंत कुठेही कार्यवाही झाल्याचे आढळुन आलेले नाही,गावठी दारु विक्रीचे प्रमाण अधिक वाढले असुन हातभट्टी विक्रेत्याची मात्र चांदी होत आहे लाँकडाऊन च्या काळात जर अश्याप्रकारे दारू विक्री होत असेल तर हे एक मोठे संकट म्हणावे लागेल कोरोनाला अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांची अमल बजावनी सरकार कडुन केली जात आहे मात्र ज्या ठिकानाहुन हा कोरोना संसर्ग वाढु शकतो ती दारू आड्डे मात्र राजरोसपणे चालु असल्याचे चित्र आष्टी व आष्टी परिसरात पहावयास मिळत आहे.
Leave a comment