शिरोडा येथील कोरोनाबाधित महिलेच्या सहवासितांपैकी 63 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी
जालना । वार्ताहर
दु:खीनगर भागातील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या स्वॅबचे तीन नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते. दि. 21 एप्रिल, 2020 रोजी स्वॅबचा नमुना निगेटीव्ह प्राप्त झाला परंतु महिलेच्या स्वॅबचा नमुना पाचव्यावेळी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असता त्याचा अहवाल दि. 23 एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आला असुन महिलेची प्रकृती गंभीर आहे. तसेच शिरोडा ता. परतुर येथील कोरोनाबाधित महिलेच्या 8 हायरिस्क व 68 लोरिस्क अशा एकुण 76 सहवासितांपैकी 63 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
शिरोडा ता. परतूर येथे येथे कोरोनाग्रस्त महिला आढळल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असलेली दोन पथके तयार करण्यात येऊन 80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत. वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत. या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 854 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 108 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 535 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 69 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 637 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 (दु:खीनगर येथील महिलेचा पुन:तपासणी नमुना) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 555, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 96, एकुण प्रलंबित नमुने-72 तर एकुण 427 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 02, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 275 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 00, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -301, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-49, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 108, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 143 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 301 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 338 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 402 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन दि. 23 एप्रिल, 2020 पर्यंत एकुण 449 ऊसतोड कामागारांना जिल्ह्यामध्ये आले आहेत. यामध्ये बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात कोल्हापुर 36, औरंगाबाद-9 व सातारा येथुन 6 असे एकुण 51 कामगार, घनसावंगी तालुक्यात सातारा 3 व कोल्हापुर येथुन 9 असे एकुण 12 कामगार, तर अंबड तालुक्यात सांगली 109, पुणे-17, सातारा-68, कोल्हापुर-16, सोलापुर-49 असे एकुण 259 कामगार दाखल झाले आहेत.
Leave a comment