शिवसेना प्रमुखांचे संस्कार कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न-माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

जालना । वार्ताहर

कोरोना महामारीस रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या गोर- गरीब, मजूर, कामगार, श्रमजीवी कुटूंबियांसमोर जगण्याची भ्रांत पडली असतांना   संकटं तिथे मदतीला शिवसेना ‘ हे ब्रीद सार्थ ठरवत सर्व प्रथम जालना शहर व जिल्हाभरात शिवसेना पक्ष गरजवंतांना मदतीसाठी धावून आला आहे. मुंबई येथील कोरोना ग्रस्तांना मदत, पहिल्या टप्प्यात जनजागृती, घरपोच भोजनाची पाकीटे, भाजीपाला वितरित करत माणसे जगविण्यासाठी सुरू असलेल्या सेवा यज्ञात शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मोठा समिधा वाहिला असून आता घरपोच किराणा साहित्य मिळणार असल्याने  गरजवंतांसाठी शिवसेना मोठी आधार वड ठरली आहे. तथापि ‘ गरज पडेल तिथे मदतीचा हात सदैव पुढे करा ‘ ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत जोपासून मदतीचा अल्पसा प्रयत्न केला असल्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.  शिवसेनेच्या वतीने हजारो कुटूंबांना सोशल डिस्टन्स चे पालन करून किराणा साहित्य वाटपाचा शुभारंभ गुरूवारी ( ता. 23) भागवताचार्य प.पू.शेष महाराज गोंदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, अनिरूध्द खोतकर, संजय खोतकर, पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, संतोष मोहिते,शहर प्रमुख विष्णू पाचङ्गुले, आत्मानंद भक्त,दीपक रन्नवरे,युवासेना समन्वयक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे, हरीहर शिंदे, नगरसेवक विजय पवार,अशोक पवार, निखिल पगारे, संतोष जांगडे, गणेश घुगे, गोपीकिशन गोगडे,संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर, संताजी वाघमारे, दादाराव पाचङ्गुले, राम सतकर,शंकर लुंगे, विजय जाधव, जगन्नाथ चव्हाण, आदींची उपस्थिती होती.  माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यावेळी बोलतांना म्हणाले की, एकीकडे राज्याला कोरोना मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रत्येक क्षणास झटत आहेत. लॉकडाऊन मुळे संकटात सापडलेल्यांना मदतीसाठी शासनासोबतच शिवसेना पक्षाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. असे खोतकर यांनी नमूद केले. जालना जिल्ह्यात वाडी, वस्ती, तांडे यांसह शहरी भागातील झोपडपट्टया, कामगार, श्रमजीवी व सर्वसामान्य कुटुंब राहत असलेल्या वसाहतींमध्ये मदत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरु असून याच सेवेचा एक भाग म्हणून ही मदत देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. असे सांगून सर्व नगरसेवक, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी यांच्या मार्ङ्गत नियोजन बध्द रितीने सोशल डिस्टन्स राखत सदरील मदत वाटप केली जाणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.  या वेळी अंकुश पाचङ्गुले, घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, राजेश घोडे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, किशोर शिंदे, सुशील भावसार,दीपक वैद्य, संतोष परळकर, दीपक राठोड, संतोष क्षोञीय, भोला कांबळे शिवाजी मुळे यांच्या सह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.