जालना । वार्ताहर
दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पिठाची गिरणी, कृषि निविष्ठा (बि-बियाणे), खते, किटकनाशके, कृषी औजारे, पेट्रोलपंप ही दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले असुन या वेळेव्यतिरिक्त दररोज सायंकाळी 6.00 ते 8.00 या वेळेत जिल्ह्यात दुध वाटपासाठी, संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी दुधविक्रेत्यांना सुट देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी, जालना यांनी कळविले आहे.
तसेच अत्यावश्यक सेवा व त्यासंबंधीची सेवांची गोदामे व त्यातील कर्मचारी यांनाही आदेशातुन सुट देण्यात आली असुन वाहतुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधितांना पास देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
Leave a comment