मंठा । वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भुजंगराव शंकरराव गोरे (वय 76 वर्ष) यांचे मंगळवारी (ता.21) जालना येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून बाजार समितीचे सभापती संदीप गोरे व जिंतूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांचे ते वडील होत.
मंठा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य, जालना जिल्हा परिषदेचे उपसभापती, मुंबई मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आदी विविध राजकीय पदे त्यांनी भूषविली आहेत. ते आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आता भारतीय जनता पार्टी पक्षात ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते.
Leave a comment