कोरोनाच्या लढाईत सामुहिक विजय होईल -उपनगराध्यक्ष राजेश राऊत
जालना । वार्ताहर
कोरोना आजाराला हरविण्यासाठी प्रत्येकांने सोशल डिस्टन्सींग आणि घरातच थांबण्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाला अटकाव घालण्यात शासन-प्रशासनाला यश येत आहे. तथापि कर्तव्य समजून प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास या लढाईत सामुहिक विजय मिळेल असा विश्वास उप नगराध्यक्ष तथा स्वा. सै.रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी व्यक्त केला. स्वा.सै.रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद असलेले हमाल,मापाडी,कामगार,मजूर यांच्या सह संग्राम नगर,बक्कलगुडा,बन्सी पुरा लोहार मोहल्ला बस स्टँड परीसर भागातील 1 हजार गरजवंत कुटूंबियांना संसार उपयोगी साहित्य किटचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. राजेश राऊत बोलत होते. संस्थेचे संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी या वेळी सांगितले की, गरजवंतांना मदत करण्यासाठी शासनासह सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. अशा वेळी नागरिकांचेही सर्वांना सहकार्य मिळणे आवश्यक असून सर्वांच्या संघटीत प्रयत्नानंतरच कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. असे राजेश राऊत यांनी नमूद केले.आजघडीला कोरोना शेवटच्या टप्प्यात जात असतांना त्याच्या संसर्गाची भीती अधिक वाढली असून ही बाब सर्वांनी गांभीर्याने लक्षात घ्यावी, असे आवाहन ही उपनगराध्यक्ष तथा पतसंस्थेचे चेअरमन राजेश राऊत यांनी केले. यावेळी सभासद व परिसरातील नागरिकांची सोशल डिस्टन्सींग पाळून उपस्थिती होती.
Leave a comment