शासनाकडून मदतीची मागणी
जालना -वार्ताहर
कोरोना व्हायरसने जगभर थैमान माजवलेले असुन शहरीभागाबरोबार आता त्याने ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने त्याचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य तथा केंद्र शासनाने गेल्या एका महीन्यापासुन देशभर लाँकडाऊन केलेला असल्याने सर्वजण आपआपल्या घरांमध्ये बंदीस्त झालेले असुन सर्व कामे,व्यवहार ठप्प झालेले आहे. याचा व्यापारी व तळहातावर उदरनिर्वाह असणारे म्हणजेच बारा बलुतेदार समाज यांच्या व्यावसायाला मोठा ङ्गटका बसलेला आहे.
लाँकडाऊनमुळे लग्न समारंभ यात्रा महोत्सव यासह असे विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द झालेले असतांना याचा बाराबलुतेदारांवर मोठा ङ्गटका बसलेला असुन या घटकात अनेक जातीचे नागरीक लहान मोठा व्यवसाय करुन आपला उदर निर्वाह भागवित असतात मात्र गेल्या एका महीन्यापासुन सर्वजण घरीच असुन लग्नसराई व यात्रा महोत्सव बाराबलुतेदारांचा हंगाम असतो आणि या हंगामात प्रत्येकाच्या हाताला काम असते मात्र ऐन या हंगामाच्या दिवसात कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले असल्याने संचारबंदी लावण्यात आलेली असुन अशा या बिकट परीस्थितीत बाराबलुतेदार हतबल झालेला आहे त्यांच्या जवळ असलेले तुटपुंजे भांडवल त्यांनी व्यवसायात गुंतवून आता हाताशी काहीच रोकड शिल्लक राहीलेली नाही.त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा कशा पुर्ण कराव्या हा यक्षप्रश्न बलुतेदार बांधवा पुढे आव आसुन उभा आहे. या परीस्थितीमध्ये शासनाकडून आम्हाला काही विशेष पँकेज जाहीर होते का? असा प्रश्न देखील राज्यातील बारा बलुतेदार व्यवसाय असलेले नाभिक,परीट,सुतार,कुंभार,गुरव भोई,सिंपी,सोनार, बेलदार,लोहार,साळी, भावसार,ग्रामजोशी,कोळी,चर्मकार यांनी उपस्थित केला आहे. या सोबतच बलुतेदार वर्ग हा बहुतांशी भुमीहीन असल्याने त्यांची गुजरान ही व्यवसायांवरच अवलंबुन आहे.यातील 90टक्के व्यावसायिकांची दुकाने तथा घरे भाडे तत्त्वावर असुन त्यांनी विविध पतसंस्था ,बँकामधुन ङ्गायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन आपले व्यवसाय उभे केलेले आहे.अशा परीस्थितीत आता हे कर्ज कसे ङ्गेडावे यासह अनेक प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे.घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाला वाढीव मुद्त मिळवुन त्यावरील संपुर्ण व्याज व दंड माङ्ग करण्यात यावे तसेच भुमीहीन व्यावसायिकांचे घरचे तसेच व्यावसायिक लाईटबील शासनाने माङ्ग करावे अशी मागणी बाराबलुतेदारांनी केली आहे. दरम्यान काँग्रेसचे जेष्ट नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष श्री.माणिकराव ठाकरे यांनी बांधकाम कारागिरांना महाराष्ट्र शासन देत असलेल्या दोन हजाराच्या मदतीची प्रशंसा करीत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच कोरोनामुळे बारा बलुतेदारांवर ओढावत असलेल्या समस्यांचे सुक्ष्मपणे निरीक्षण करुन बारा बलुतेदारांनाही बांधकाम कामगारांच्या योजनेत समाविष्ट करुन घ्यावे व त्यांनाही दोन हजारांची आर्थिक मदत करावी अशी मुख्यमंत्र्याना ट्विटच्या माध्यमाने नुकतीच मागणी केली आहे.
Leave a comment