फर्दापूर दि.3(प्रतिनिधी) अज्ञात कारणासाठी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी देव्हारी (ता.सोयगाव) येथील आरोपी विरूध्द अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फर्दापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की दि.1 बुधवारी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही,करीता त्यांनी मुलीचा संपूर्ण घरासहीत आजूबाजूला शोध घेतला असता मुलगी कोठेही मिळून आली नाही दरम्यानच्या काळात मुलीचा शोध घेतेवेळी सदरील अल्पवयीन मुलीला गावातीलच अभय अर्जुन इंगळे याच्या सोबत जातांना एका महिलेने बघितल्याची माहिती मिळाली दरम्यान दि.2 गुरुवारी सायंकाळी फर्दापूर पोलिस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अभय अर्जुन इंगळे(रा.देव्हारी ता.सोयगाव) विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन जमादार साहेबराव मोरे,दिलीप पवार,रविराज बागूलकर,चेतन ठाकरे हे करीत आहे.
Leave a comment