दान नाही तर माझं कर्तव्य....
आष्टी - सतीश पवार
काळ कठीण आहे पण खंबीर राहू,
समाजातील प्रत्येकांशी माणुसकीच नातं जपू,
गरजूंची गरज पूर्ण करण्याच कर्तव्य पार पाडू,
कोरोना सारख्या महाभयंकर संकटात लॉकडाऊन झाल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. अशा परिस्थिति एक वेळचं जेवण सुध्दा होत नाही. जगावे कसे हा प्रश्न होता..? अशावेळी माणूस म्हणून सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे.
याचाच एक छोटासा प्रयत्न नायक फाउंडेशन परतूर यांच्या वतीने मा. महेश भाऊ पवार, अर्जुन नायक, महेश सांगूंळे, विठ्ठल वाघमारे, सुरेश आढे, साई राठोड, प्रदीप आढे यांच्या हाताने छोटी मद्दत म्हणून परतुर व मंठा तालुक्यातील गुळखंड,वाटुर,श्रीष्टी ,हास्तुर,परतवाडी,कनकवाडी,को.हादगाव,ढोकमाळ व परिसरातील गावांना किरणा अन्न धान्य किट देऊन हातावर पोट असणाऱ्या ज्यांना दररोज काम केल्याशिवाय स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हते आशा ह्या गरिब कुटुंबाना वाटप करण्यात आलं...
Leave a comment