जालना । वार्ताहर
योगेशनगर परीसरातील सेनाजी काळे यांच्या निवास स्थानी घरीच संत सेना महाराज जयंती साजरी करून गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी नाभिक सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष सेनाजी काळे यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस प्रथम पूजन करून गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सखाराम वाघमारे, श्रीमती शांताबाई वाघमारे, वरद काळे, श्रीमती प्रतिभा काळे, वैष्णवी काळे, श्रीमती जयश्री साळवे, डेव्हिड घुले हे होते.
Leave a comment