जालना । वार्ताहर
देशभरात पसरत चाललेला कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केल्यामुळे सी.सी.आय. मार्ङ्गत सुरू असलेले कापूस खरेदी बंद झाली होती ही कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक डोके यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकर्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. कापसावर अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात.असा कापूस घरात राहिल्याने याचा प्रादुर्भाव शेतकर्यांच्या निरोगी आरोग्यावर होऊ शकतो.त्यासोबत आवश्यकते पेक्षा जास्त काळ घरात कापुस ठेवल्याने खराब सुध्दा होऊ शकतो.यो दोन्ही स्थितीत नुकसान शेतकर्यांचेच आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक डोके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सी.सी.आय.तर्ङ्गे तात्काळ कापूस खरेदी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
Leave a comment