जालना । वार्ताहर

कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात शहरवासियांची अन्नधान्य, ङ्गळे व भाजीपाला खरेदीसाठी होत असलेली परवड पाहता ग्राहकांना घरपोच घाऊक दरात सेवा मिळावी यासाठी हॅपी इंडियन मार्टने सेवा सुरु केली आहे. प्रायोगिक तत्वावर जालना शहरात हॅप्पी इंडियन मार्टकडून सध्या ग्राहकांना घरपोच ताजी ङ्गळे, भाजीपाला व अन्नधान्य पुरवठा सेवा देण्यात येत असुन जालना शहरातील ग्राहकांनीही कंपनीच्या या उपक्रमास पसंती दिल्याचे आढळून येत आहे शेतकरी व ग्राहक यांच्यातील वितरण व्यवस्थेत अनेक टप्पे असल्याने ङ्गळे, भाजीपाला व अन्नधान्यासाठी शहरातील ग्राहकांना जी अतिरिक्त किंमत मोजावी लागत होती त्यास आता आळा बसत असुन ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये घरपोच वस्तु उपलब्ध होत आहेत. सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करीत कंपनीद्वारा घरपोच सेवा दिली जात आहे. येत्या 14 एप्रिल रोजी हॅप्पी इंडियन मार्टचे स्मार्टङ्गोन अ‍ॅप्लीकेशन व संकेतस्थळ  हींींिी://हरििूळपवळरपारीीं.लेा  सुरु होत असुन ग्राहकांना मोबाईल व इंटरनेट वरुन ङ्गळे, भाजीपाला व किराणा ऑर्डर करता येणार आहे. सर्व तालुक्यात शाखा -जालना जिल्ह्यातील बदनापुर, अंबड, भोकरदन, परतुर, मंठा, जाङ्गराबाद, घनसावंगी या तालुक्यातही हॅप्पी इंडियन मार्टच्या शाखा सुरु होत असल्याने या शहरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. शिवाय शेतकर्यांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.