बदनापूर । वार्ताहर
देशात व राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्भूमीवर विविध उपाययोजना करत असतानाच वैयक्तीक काळजी घेणेही महत्त्वाचे असते त्यासाठी शासनाचे आरोग्य सेतू पस जर आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले तर कोरोनाबाबत मार्गदर्शन मिळण्यास मदत होते त्यामुळै हे प ग्रामीण भागातील जनतेपर्यंत जाण्यासाठी संगणक परिचालकही मेहनत घेत असून बदनापूर तालुक्यातील संगणक परिचालकांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हे डाऊनलोड करावयाला लावून वापर कसा करायचा हे दाखवून देत गावा गावात विविध उपाययोजना करण्यातही हे परिचालक सहभागी हेाऊन कोरानाला गावात येऊ न प्रशासनासोबत राहून देण्यासाठी लढा देत आहेत.
कोरोना विरोधातील मोहितील प्रशासनातील आरोग्य, पोलिस, ग्रामविकास, महसूल, उर्जा आदी विभागाबरोबर गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले संगणक परिचालक सुध्दा सक्रिय सहभागी आहेत. बाहेरगावाहून आलेल्यांची नोंद ठेवणे, गावात गस्त घालणे, रेशन वाटप करताना मदत करणे आदी कामे संगणक परिचालक गाव पातळीवर करत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाची माहिती देण्यासाठी बनवण्यात आलेले आरेाग्यसेतू हे प सर्व ग्रामस्थांच्या मोबाईलवर डाऊनलोड करून त्याचा वापर कसा करावयाचे या बाबतही गावकर्यांना मार्गदर्शन करत आहेत. या बाबत बदनापूर संचाकण परिचालक संघटनेचे तालुका सचिव उध्दव जोशी यांनी सांगितले की कोरोनाच्या विरोधातील लढाईल संगणक परिचालकही सहभागी झालेले असून गावपातळीवर विविध उपाययोजना करत आहेत. त्याचप्रमाणे आरेाग्यसेतू हे प प्रत्येक संगणकचालकांना त्यांच्या गावातील 200 ते 300 ग्रामस्थांना डाऊनलोड करून देण्याचे उदिदष्ठ ठरवून दिलेले आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वजण सामाजिक बांधिलकी म्हणून लढत असून प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी संगणक परिचालक प्रशासनाबरोबर काम करत असल्याचे सांगितले
Leave a comment