बदनापूर । वार्ताहर
येथे अंत्योदय योजनेतंर्गत प्रति व्यक्ती पाच किलो तांदुळाचे मोङ्गत वाटप येथील स्वस्त धान्य दुकानामार्ङ्गत सोशल डिस्टन्सींग ठेऊन करण्यात येत असून गर्दी टाळण्यासाठी टोकन देऊन त्या टोकननुसान हे वाटप् सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या अंत्योदय योजनेतील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो मोङ्गत गहू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येत आहे. बदनापूर शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोनचे ज्ञानेश्वर सर्जेराव जर्हाड यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या दुकान परिक्षेत्रात 450 अंत्येोदय योजनेतील कार्डधरक असून 1990 व्यक्तींची नोंद या अंतर्गत आहे. त्या अनुषंगाने आम्हाला शासनाकडून 99.50 क्विंटल तांदूळ मोङ्गत वितरणासाठभ् उपलब्ध झालेला असून सोमवार सकाळपासून शासनाचे कर्मचारी इंगोले यांच्या उपस्थितीत वाटप सुरू करण्यात आलेले आहे.
प्रत्येक व्यक्तीला 5 किलो या प्रमाणे हे वाटप होत असून यासाठी सोशल डिस्टन्सींंगचा वापर करण्यात येत आहे. आम्ही लाभार्थींना टोकन देऊन त्या टोकन क्रमांकानुसार बोलावून त्यांना तांदूळ वाटप करत आहोत. शासनाने तांदूळ देताच सोमवारपासून या वितरणाचा अनौपचारित शुभांरभ केला असून या वेळी पुरवठा विभागाचे इंगोले, दुकानदार ज्ञानेश्वर जर्हाड, जनार्धन अंबादास पवार, मंजीत दामोधर पवार, सुंगधा रईंद, संदीप पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना अंत्योदय योजनेतील तांदूळ पुरवठा विभागाकडून वितरीत झालेला असून सर्व दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींग पाळत टोकन देऊन हा तांदूळ तात्काळ मोङ्गत वितरीत करावा असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Leave a comment