दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे २५ संशयित व्यक्तींची बुधवारी सायंकाळपर्यंत शहरातील स्वतंत्र 'कोव्हिड १९ हॉस्पिटल' अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व संशयितांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांच्यापैकी १२ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले व त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरीच अलगीकरण कक्षामध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी दोनजणांचे स्वॅब पुनर्तपासणीसाठी पुण्याच्या `एनआयव्ह`कडे पाठवण्यात आले आहेत.
दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरातील १२ व १३ मार्च रोजी झालेल्या 'तबलिगी जमात'च्या धार्मिक कार्यक्रमात देश-विदेशातून व देशातील अनेक राज्यांतून आलेले सुमारे अडीच हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी २४ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे व ४४१ व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर यातील अनेकांचा मृत्यू झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या व नऊ मार्चपासून औरंगाबाद शहरातील नातेवाईकांकडे वास्तव्यास असलेल्या सात व्यक्तींची बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे २५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, जे निजामुद्दीनच्या कार्यक्रमात एकतर सहभागी झाले होते किंवा कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संपर्कात तरी आले होते.
या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये करोना विषाणू बाधेची लक्षणे आढळून आली नसली तरी नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १२ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात बुधवारी एकूण १८ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून, घाटीच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात बुधवारी एकूण १५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली व एकूण ७६ व्यक्तींना 'होम क्वारंटाइन'चे आदेश देण्यात आले आहेत. यातील अनेकजण अंदमान-निकोबारचे रहिवासी आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल ऑफिसर डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने बुधवारी ३६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली व त्यापैकी चार व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत, असे घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.