शेतकर्यांनी केले अंत्यसंस्कार
केज । वार्ताहर
केज तालुक्यातील साळेगाव येथे विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचार्यांनी हरिणाच्या मृतदेह वर काढून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली.
साळेगाव येथील शिवारात ज्ञानोबा बचुटे या शेतकर्यांच्या विहिरीत हरीण पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पत्रकार जय जोगदंड व अक्षय वरपे यांना मिळताच त्यांनी धारूर वनविभागाचे परिक्षेत्र वनअधिकारी मुंडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्या नंतर वनविभागाचे कर्मचारी मोराळे मॅडम, भालेराव व गायसमुद्रे यांनी जय जोगदंड, अक्षय वरपे, राजाभाऊ वरपे, स्वप्नील वरपे, आकाश घाटूळे, ज्ञानोबा बचुटे यांच्या मदतीने हरिणाचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. त्याच्यावर अग्निसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली. दरम्यान वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी त्यांचा वावर असलेल्या भागात पाणीसाठे नसल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. असे वनअधिकारी मुंडे यांनी माहिती दिली.
Leave a comment