गेवराई पंचायत समितीसमोर रोजगार सेवकांकडून आनंदोत्सव साजरा
धोंडराई | वार्ताहर
राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ झाली असून आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान त्यांना लागू होणार आहे. या निर्णयाबद्दल गेवराई पंचायत समितीसमोर ग्रामरोजगार सेवकांकडून फटक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष जालिंदर शेजूळ, उपाध्यक्ष गंगाधर गलधर ,सचिव गौतम तुरुकमारे , भगवान आडागळे , नंदकुमार पौळ, शहाजी तौर , सुभाष लोंढे, नदीम शेख , सुदर्शन गाडे,मुरलीधर शिंदे यांच्या सह तालुक्यातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील महायुती सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. यामध्ये ग्राम रोजगार सेवकांना आता महिन्याला आठ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार असून, प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळं राज्यातील ग्राम रोजगार सेवकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना आता राज्य सरकार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. या निर्णयाबद्दल गेवराई पंचायत समितीसमोर ग्रामरोजगार सेवकांकडुन फटक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment