आदित्य शिक्षण संस्थेत टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उद्घाटन
बीड | वार्ताहर
आदित्य शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि तज्ज्ञ प्राध्यापकांकडून होत असलेल्या ज्ञानार्जनामुळे आज आदित्य शिक्षण संस्थेचे विद्यार्थी अटकेपार झेंडा लावत आहेत. कृषी, शिक्षण, आरोग्य, आयटी, क्रीडा अशा विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून येथील विद्यार्थी दिसतात याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी येथे मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेऊन आपले आणि आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे. त्यातून आदित्य शिक्षण संस्थेचे नावही देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात अभिमानाने घेतले जाते. असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी केले.
सीए गिरीश गिल्डा यांच्या संकल्पनेतून शहरातील आदित्य शिक्षण संस्थेत टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. याचे उदघाटन मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी डॉ. आदित्य सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा व संतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना डॉ. आदित्य सारडा म्हणाले की, आदित्य शिक्षण संस्थेची शिक्षण क्षेत्रामध्ये यशाची परंपरा कायम आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज टर्फ मल्टिस्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा व आपल्या पालकांचे नाव मोठे करावे जेणेकरून संस्थेचे नाव देखील मोठे होईल. मला अभिमान आहे. आपल्या संस्थेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअर करतांना अनेक संस्थेत नेतृत्व करतात. तर शासकीय सेवेत चांगल्या पदावर अधिकारी आहेत. या पुढेही आपल्या संस्थेतून मोठ-मोठ अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावला जाईल त्यासाठी लागेल ती मदत सातत्याने पुरवण्यात येईल असेही डॉ. आदित्य सारडा यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला आदित्य शिक्षण संस्थेतील प्राचार्य डॉ.कल्याण अपेट, प्राचार्य शाम भुतडा, प्राचार्य डॉ. सतीश कचरे, प्राचार्य कडू, प्राचार्य डॉ. विकास गर्जे, प्राचार्य बहिरवाल, प्राचार्य लहुजी हिंगणे, प्राचार्य डॉ. हिमांशू श्रीवास्तव यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास गर्जे यांनी तर आभार आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी मानले.
विद्यार्थ्यांसाठी टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स उपलब्ध करूण देणारी आदित्य शिक्षण संस्था मराठवाड्यात एकमेव
शहरातील आदित्य शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम तत्पर असते. शिक्षक, विद्यार्थी यांनी मागणी करण्यापूर्वीच आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना काय हवे काय नाही. याकडे संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा, संचालक आदित्य सारडा, आदिती सारडा यांचे प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असते. त्यामुळेच येथील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आज अटकेपार झेंडा लावत आहेत. आदित्य शिक्षण संस्था ही मराठवाड्यातील एकमेव संस्था आहे. जिने विद्यार्थ्यांसाठी टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स उपलब्ध करून दिले आहे.
१०० बाय ८० चे प्रशस्त टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स
आदित्य शिक्षण संस्थेच्या बी कॅम्पस मध्ये तब्बल १०० बाय ८० चे प्रशस्त टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून त्याचे मंगळवारी उद्घाटन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांना डे-नाईट क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिन्टन, हॉलीबॉल, हँडबॉल खेळता येणार आहे. सर्व बाजूंनी जाळ्या बसवण्यात आल्या असून आत्याधूनीक पध्दतीने येथे विद्यार्थ्यांसाठी टर्फ मल्टि स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे.
Leave a comment