16 हजार रुपयांचे आठशे लिटर रसायन केले नष्ट
एकूण दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल
फर्दापूर दि.2(प्रतिनिधी) अवैधरीत्या साठवलेल्या गावठी दारूच्या रसायनसाठ्यासह एका जुगार अड्ड्यावर छापा मारून या दोन्ही छाप्यात एकूण दहा आरोपीन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी 16 हजार रुपये किमंतीचे आठशे लिटर नष्ट केले व जुगाराच्या साहित्यासह 910 रुपये नगदी जप्त केले आहे ही कारवाई साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे,पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे,सचिन केंद्रे,रविंद्र सावळे,नारायण खोडे,प्रविण गवई,दिपक सोनवणे,कदम मपोकॉ ज्योती परळे यांच्या पथकाने फर्दापूर येथील तडसखोरी शिवारासहीत वरखेडीखुर्द (ता.सोयगाव) येथे बुधवार रोजी केली आहे,या बाबत अधिक माहीती अशी की फर्दापूर (ता.सोयगाव)येथील तडसखोरी शिवारातील धरणा शेजारील नाल्याच्या जंगलात अवैधरीत्या गावठी दारु पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवले असल्याची माहिती गुप्त बातमीदारा कडून पोलिसांना प्राप्त झाली होती या माहीतीच्या आधारे फर्दापूर पोलिसांच्या पथकाने बुधवार रोजी तडसखोरी शिवारातील धरणाशेजारील नाल्यात छापा मारला असता पोलिसांना त्या ठिकाणी गावठी दारु पाडण्यासाठी लागणारे सुमारे 16 हजार रुपये किमंतीचे आठशे लिटर रसायन अवैधरीत्या साठवल्याचे दिसून आले,पोलिस पथकाने हे सर्व रसायन नष्ट करुन आरोपी याकुब इसा तडवी (रा.फर्दापूर ता.सोयगाव) विरूध्द गुन्हा दाखल केला आहे दरम्यान बुधवार रोजी फर्दापूर पोलिसांचे पथक गस्तीवर असतांना वरखेडीखुर्द (ता.सोयगाव) येथे काही जण पैश्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरखेडीखुर्द येथील एका शेतात छापा मारला असता शेतातील लिंबाच्या झाडाखाली विनोद बाबूसिंग राजपूत(42)विवेक इंदलसिंग राजपूत(26)दिपक इंदलसिंग राजपूत(32)रविंद्र किसन राजपूत(32)कैलास दौलतसिंग राजपूत(33)सुभाष लक्ष्मण बसय्यै (52)कुलदिप विजयसिंग राजपूत(33)सागर कांतीलाल गोमलाडू (20) व बादल राजेंद्रसिंग राजपूत (सर्व रा.वरखेडीखुर्द ता.सोयगाव)हे सर्व जन पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना रंगेहाथ मिळून आले पोलिसांनी आरोपीन कडून जुगाराचे साहित्य व 910 रुपये रोख जप्त करुन आरोपीन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आठवडा भरापासून पोलिसांनी अवैधधंद्यान विरूध्द मोहीम उघडल्याने परीसरातील अवैधव्यवसायीकांचे धाबे दणाणून गेल्याचे दिसत आहे.
Leave a comment