जालना । वार्ताहर
जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांपैकी 30 वर्षी महिलेच्या 37 वर्षीय पती व त्यांच्या 15 निकट सहवासितांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले असुन खबरदारी म्हणुन संबंधितांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गुंडेवाडी येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, दोन पर्यवेक्षक व 12 आरोग्य कर्मचार्यांचा समावेश असल्याचे पथकाने गुंडेवाडी परिसरातील 266 कुटूंबातील 1 हजार 632 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन यामध्ये एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 321 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना - 47, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-27, पोलीस प्रशिक्षण केंद्र-97, मंठा येथे 13 तर अंबडयेथील मुलांचे वसतीगृह येथे 46 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 714 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 120 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 17 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 503 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 477, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-20 तर एकुण 301 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 150 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 10, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -321, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-16, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 08, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 120, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह तर एक 62 वर्षीय महिला गंभीर फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असुन दोघींचीही प्रकृती गंभीर असुन दोनही महिलांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. दि. 18 एप्रिल रोजी एक 34 वर्षीय पुरुष न्युमोनिया आजाराने दाखल झाला असुन त्याच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 240 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Leave a comment