मंठा । वार्ताहर
तालुक्यातील अनेकांनी मंगल कार्यालय, वाजंत्री, फोटोग्राफर, आचारी, केटर्स आदी लग्नकार्यशी संबंधित व्यवसायिकांना डव्हान्स देऊन लग्न तारीख निश्चित करून धूमधडाक्यात लग्नकार्य करण्याचे ठरविले होते. परंतु कोरोनाच्या धास्तीने देशात संचारबंदी लागू झाली आहे. लग्न समारंभ व सर्वच सार्वजनिक गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी आली आहे. मागील महिन्यात होणारी लग्नकार्य रद्द झाले आहेत. तर लॉकडाऊन संपल्यानंतर देखील धुमधडाक्यात लग्न करता येणार नाही. तसेच पावसाळा सुरू होऊन शेतीच्या कामांना सुरुवात होणार. लग्नकार्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणून अनेकांनी संचारबंदी संपताच लवकरात लवकर व काही तासाच्या आत घरच्या घरी पाचदहा नातेवाईकांच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने लग्नकार्य उरकून घ्यायची तयारी सुरु केली आहे.
लग्नाची तयारी म्हणून अनेकांनी कापड, किराणा, सौंदर्यप्रसाधने, सोन्याचे दागिने, फ्रीज, कूलर, पलंग आदी वस्तू खरेदी केल्या होत्या त्या वधू-वरास दिल्या जातील. परंतु मंगल कार्यालय, वाजंत्री, फोटोग्राफर, आचारी, केटर्स यांना डव्हान्स दिलेली रक्कम परत मिळणार नाही. लग्नकार्य रद्द झाल्याने अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
Leave a comment