जालना । वार्ताहर
कोरोना विषाणुशी दोन हात करण्यासाठी जगभरात लोकडाउनचे आव्हान करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा प्रदान करणार्यांपैकी युनियन बँक ग्राहक सेवा केंद्राची फार मोठी मदत ग्रामीण जनतेला होत असून बँकेचा कामाचा व्याप कमी होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या रामनगर ता.जालना येथील केंद्राद्वारे पैसे काढणे, पैसे भरणे, पैसे पाठवणे आदी सेवा वक्रंगी केंद्राच्या माध्यमातून पुरविल्या जात आहे.
केंद्र सरकारकडून महिलांच्या जनधन खात्यात पाचशे रुपये टाकण्यात आलेले काढण्यास सुलभ होत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना किसान, कल्याण योजना, पेन्शन योजना व इतर सर्व योजनेचा लाभ मिळण्यास मदत होत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अलाबाद बँक, बँक ऑफ महाराष्ट्र विजया बँक यासारख्या अनेक राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून उद्धव नरवडे बँक मित्र मार्फत मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा गावात मिळत आहे.
Leave a comment