शासनाकडे 5000 रुपये दर महा तिनं महिन्यांसाठी मदतीची केली मागणी
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
राज्यातील सिटू सह विविध बांधकाम कामगार संघटनांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळा तर्फे बांधकाम कामगारांना 5000 रुपये दरमहा प्रमाणे पुढील तीन महिने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने मात्र फक्त 2000 रुपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार व मंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये 5000 रुपये अर्थसहाय्य पुढील तीन महिन्यासाठी दरमहा द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच नोंदीत नसलेल्या कामगारांनाही हीआर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सिटू कामगार संघटना ,महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन आणि जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना करीत आहे...अशी माहिती संघटनेचे कॉम्रेड गोविंद आर्दड (अध्यक्ष, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना सिटू)
Leave a comment