फर्दापूर दि.2(प्रतिनिधी) शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचे सन 2019 पासूनचे सुमारे सात महिन्याचे बिल जि.प.कें.प्रा.शाळा फर्दापूर(ता.सोयगाव) येथील तत्कालीन मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे अद्याप पर्यंत थक्कीत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून सदरील बिल त्वरित अदा न केल्यास संचारबंदी काळात ही पंचायत समिती सोयगाव येथे आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी मुख्याध्यापक जि.प.कें.प्रा शाळा फर्दापूर यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.फर्दापूर येथील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या शांताबाई समाधान बलांडे,संगिता दुर्योधन लव्हाळे,प्रीती प्रमोद बलांडे व ज्योती अंकुश मोरे या महिलांनी निवेदनात नमूद केले आहे की सदरील महिला जि.प.कें.प्रा.शाळा फर्दापूर येथे शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करतात या महिलांचे जानेवारी2019 ते एप्रिल2019 व जुन 2019 मधील 15 दिवस असे साडेचार महिने व ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे एकूण सातसाडेसात महिन्याचे बिल शाळेच्या तत्कालीन मुख्याधपकांच्या हलगर्जी पणामुळे अद्यापपर्यंत थक्कलेले असून सदरील बिल त्वरित न मिळाल्यास पं.स सोयगाव येथे आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा या महिलांनी दिला आहे,दरम्यान सध्या कोव्हीड विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉक डाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे परिणामी ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबान पुढे उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे,अश्या परिस्थितीत ही फर्दापूर जि.प. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकाच्या हलगर्जीपणामुळे शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचे सुमारे सातसाडेसात महिन्याचे बिल थकल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या महिलेनवर संचारबंदीच्या काळात आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार फर्दापूर येथे घडतांना दिसत असून,प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन सदरील महीलेंचे थक्कीत बिल त्वरित अदा करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे.
Leave a comment