कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील चेअरमन समर्थ महिला सहकारी संस्था, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मजूर संस्था या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत तांदूळ वाटप ता.17 शुक्रवार रोजी सुरू करण्यात आले आहे .कोरोना विषाणू आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत संचारबंदीचा कालावधी 3 तीन मे पर्यंत वाढवण्यात आला असून अशा परिस्थितीमध्ये सर्वच व्यवहार उद्योगधंदे मजूर वर्गांना रोजंदारी काम बंद असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही.
या देशातील गोर-गरीब जनता उपाशी राहिली नाही पाहिजे असे पंतप्रधांनी मत व्याक्त करत, केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन कार्ड वरील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ याप्रमाणे वाटप करण्यात यावी असे शासनाचे आदेश असून सुरू करण्यात आलेल्या योजनेतून धान्य वाटप करण्यात येत आहे कुंभार पिंपळगाव येथे सोशल डिस्टन्सचे पालन करत मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक विनोद भगत यांची उपस्थिती होती कुंभार पिंपळगाव येथील मोफत तांदूळ वाटप सुरु होताच लाभार्थ्यांनी लाभ घेण्यास सुरुवात केली असून कुंभार पिंपळगाव येथील लाभार्थ्यांना मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Leave a comment