औरंगाबादः पुण्याहुन परतलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला तर शहरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय गृहीणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. सध्या दोन्ही रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी बोलतांना दिली.
औरंगाबाद शहरात १३ मार्च रोजी एक ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेवर खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाला नेगिटीव्ह आला. आता गुरुवार (ता.२) एप्रिल रोजी शहरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने रुग्ण ज्या भागात राहतात तेथे स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
२१ वर्षीय तरुण हा पुणे येथून परतला होता. त्याला काही दिवसांपुर्वी त्रास सुरु झाल्यानंतर जिल्हा सामन्य रुग्णालयात भरती करुन स्वॅब नमुन हे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब मध्ये पाठविण्यात आले होते. तेथे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले. तेथे सुद्धा हे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात ५५ वर्षीय महिलेचे पती हे दिल्ली येथून आले होते. मात्र त्यांच्या पतीला त्रास झाल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करुन घेतले. मात्र या महिलेस त्रास सुरु झाल्यानंतर त्यांचे स्वॅब नमुन तपासणीसाठी पाविण्यात आले होते. हे नमुने पॉझिटीव्ह आले आहे. महिलेचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांचे पतीचा स्वॅब घेण्यात आला आहे.
Leave a comment