जालना । वार्ताहर
सध्या सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचार घेत असलेल्या दु:खीनगर येथील कोरोनाबाधित 65 वर्षीय महिलेचा स्वॅब दुसर्‍यांदा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 558 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 86 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 366 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 445 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 (पॉझटीव्ह असलेल्या महिलेच्या दुसर्‍या तपासणीचा अहवाल) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 429, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-11 तर एकुण 280 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 11, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 103 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 07, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-00, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 86, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालना शहरातील दु:खीनगर, गांधीचमन, आनंदनगर, नुतन वसाहत परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन शिघ्रकृती दल व दंगा नियंत्रण पोलीस पथकाच्या जवानांनी पथसंचलन केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 232 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.