जालना । वार्ताहर
कोरेाना विषाणु कोवीड-19 अबकारी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंदच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने दि.21 मार्च 2020 पासुन ते दि.13 एप्रिल 2020 या कालावधीत एकुण 42 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात 15 वारस व 27 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 14 आरोपी अटक करण्यात आले आहेत. ज्यात हातभट्टी 378 लिटर, रसायन 9622 लिटर, विदेशी 102 लिटर, देशी 201.59 ब.लिटर, 6 वाहने जप्त करण्यात आले आहेत. ज्यात 2 चारचाकी, 1 तीन चाकी व 3 दुचाकी वाहने यांचा समावेश असून रुपये 8 लाख 79 हजार 876 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही संशयित व्यवहार असणा-या व चोरुन मद्य विक्री करण्या-या आरोपींच्या सांगण्यानुसार व अवैध मद्यसाठा करणार्या अशा संशयित अनुज्ञप्ती विरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत अनुज्ञप्ती निरीक्षण वेळी जालना जिल्ह्यातील एकुण 7 अनुज्ञप्तीवर 5 परवाना कक्ष व 2 देशी दारु विक्री अनुज्ञप्तीवर कारवाई करण्यात आली. या अनुज्ञप्तीवर भारतीय दंड विधान कलम 188 व जिल्हाधिकारी जालना यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्व कार्यक्षेत्रिय अधिकारी हे आपआपल्या कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त घालुन दुकाने बंद आहेत की नाही याची दक्षता घेतली जात आहे. ज्या दुकानदाराकडुन नियमांचे उल्लंघन झाल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासुन व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सदर संशयास्पद अनुज्ञप्तीचे व्यवहार लॉक डाऊन संपल्यावर मद्यसाठा तपासणी विषयी विशेष मोहीम राबवून त्यांचा मद्यसाठा हा तपासणी करण्यात येईल व त्यात तफावत आढल्यास अशा अनुज्ञत्या ह्या कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील. असे भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Leave a comment