पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा अन्न योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत तांदूळ वाटप केले जात आहे संचार बंदीचा कालावधी तीन मेपर्यंत वाढवण्यात आला असून या काळात सर्व प्रकारचे व्यवसाय बंद आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. नागरिकांना अन्नधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन कार्ड वरील प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ याप्रमाणे वाटप करण्यात यावे असे शासनाचे आदेश असून त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी तशा सूचना तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत .तसेच आमदार संतोष पाटील दानवे यांचे आदेशानुसार आज दिनांक सोळा एप्रिल गुरुवार रोजी भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोफत तांदूळ वाटपास सुरुवात केली असून मोफत तांदूळ मिळाल्या बद्दल पारध येथील लाभार्थ्या मधून समाधान व्यक्त होत आहे . याप्रसंगी तलाठी एस बी काळे. ग्रामसेवक संजय शिंदे. सरपंच रामेश्वर लक्कस. ज्ञानेश्वर लक्कस. रमेश लक्कस आदींच्या उपस्थितीत धान्याचे वाटप करण्यात आले.
Leave a comment