लांबच लांब रांगा ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आजार बळवण्याचा धोका
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
कोरोणा प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात असताना बँकेतील खातेदाराकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे .सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लांबलचक तीनशे ते चारशे फुटापर्यंत रांगा पहावयास मिळत आहे बँक व्यवस्थाप काकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आरोग्याला धोका बळवण्याची भीती आहे .पिंपळगावातील महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेत ग्राहकांची सकाळपासून मोठी गर्दी दिसून येत आहे.
सध्या केंद्रशासनाकडून जनधन योजनेचे महिलांच्या प्रति खात्यावर पाचशे रुपये व पंतप्रधान किसान सन्मान योजनेच दोन हजार रुपये जमा झाले असून ती रक्कम काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे .परंतु शासनाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर एक मीटरचे आंतर ठेवुन आपापले व्यवहार सुरळीत पार पाडावे अशी वारंवार सूचना देऊन सुद्धा आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. परंतु गर्दी टाळणे हाच कोरोणाचा आजार टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय असून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गर्दीतून आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज बँक उघडण्यापूर्वी बँकेसमोर तीनशे ते चारशे फुटापर्यंत ग्राहक रांगा लावून उभे असल्याचे दिसून येत होते. ग्राहकांनी बँकेसमोर एकच गर्दी केली त्यामुळे सोशल डिस्टन्स सिंगचा पार फज्जा उडाला आहे. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी प्रशासनाचे सर्व नियम जमाबंदी धाब्यावर बसून ग्राहकांकडून या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. अशी गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन. पोलीस पाटील.संबधीत पोलीस सुद्धा या.बाबीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे .त्यांनी हा विषय हाताळण्यासाठी ग्रामसुरक्षा दलांचे कर्मचारी या ठिकाणी नियुक्तीवर ठेवून सुद्धा ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशा गंभीर परिस्थितीत शासनाचे निर्देश नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. परंतु नागरिकांच्या असहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाने आता यापुढे सक्तीचे पाऊल उचलणे गरजेचे झाले असुन जे ग्राहक या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Leave a comment