युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते फिरत्या एटीएम सुविधेची सुरुवात
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपक्रम
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरामध्ये सध्या लॉक डाऊन सुरू आहे. या काळात महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तसेच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ना. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात किंवा घराबाहेर न पडू शकणार्या बँक ग्राहकांसाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फिरत्या एटीएमच्या माध्यमातून आपत्ती जिल्हा सहकारी बँकेची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे . शिवसेनेचे युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते सिल्लोड मध्ये सोमवार ( दि.13) रोजी सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत या सुविधेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेनेचे तालुका प्रमुख किशोर अग्रवाल , डॉ. संजय जामकर, सिल्लोड शाखेचे मॅनेजर श्री. सपकाळ यांची उपस्थिती होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वात जास्त खाते शेतकर्यांचे आहेत. शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत. डिजिटल वाहनांच्या या फिरत्या एटीएम च्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांना गावातच पैसे काढता येणार असल्याचे युवानेते अब्दुल समिती यांनी सांगितले. दरम्यान लॉक डाऊनच्या काळात पैसे काढण्यासाठी येवू न शकणार्या ग्राहकांना या सुविधेमुळे आधार मिळाला आहे. असे असले तरी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या बँक ग्राहकांनी तसेच बँक कर्मचार्यांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही या साठी योग्य काळजी घ्यावी असे अवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी केले आहेत.
Leave a comment