पैठण । वार्ताहर
दहा वर्षाच्या प्रतीक्षे नंतर अखेर ब्रम्हगव्हाण सिंचन योजनाचे पाणी खेर्डा प्रकल्पाकडे झेपावले असून आज सकाळी हे पाणी खेर्डा प्रकल्पात दाखल होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी दिली आहे आज सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान तीन पैकी एक पंप सुरू करण्यात आले आहे यावेळी गणपत माने मामा यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पाणी खेर्डा प्रकल्पाच्या दिशेने सोडण्यात आले याप्रसंगी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे जिप सदस्य विलास भुमरे,गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे नगर सेवक भूषण कावसान कर गणेश मडके नामदेव खरात अण्णासाहेब लबडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षा पासून रखडलेल्या ब्रम्ह गव्हाण उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची टेस्टिंग (चाचणी). मंत्री संदीपान यांच्या हस्ते व भुमरे,अधिक्षक अभियंता महेंद्र सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, नवनाथ पिसुटे,महेश देशमुख, नंद अण्णा काळे,सोमनाथ परदेशी, विजय गोरे,यांच्या उपस्थितीत एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती, ब्रम्ह गव्हाण उपसा सिंचन योजनाचा पहिला टप्पा मार्गी लागत असुन तालुक्यातील 55 गावाची शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे,मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात येणार असल्याचे संदीपान भुमरे यांनी सांगितले. माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी222 कोटी रु च्या या योजना ला मंजुरी दिली आहे,दरम्यान आज पाणी सुटल्याने शेतकर्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
14 हजार 586 हेक्टर ला होणार लाभ
पैठण तालुक्यातील 55 गावाच्या पाणी प्रश्ना सह तालुक्यातील 14 हजार 582 हेक्टर शेतीला फायदा होणार असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले. उद्या सकाळी हे पाणी खर्डा प्रकल्पात पोहोचणार आहे
Leave a comment