कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव शहर परिसरातील गोदाकाठ भागातील कापूस घरात अडकून पडला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने तापमान वाढत असल्याने घरात पडून असलेल्या कापसाचे व वजन घटणार आहे घरातील कापसावर कीडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने घरातील कुटुंबांना अंग खाजणे असा आजार वाढत आहे शेतकऱ्यांनी कापसाला बाजार भाव वाढतील या अपेक्षेने कापुस घरात ठेवला होता सीसीआय कापूस खरेदी केंद्राला कापूस हमीभावाने देण्यासाठी सूरूवातीला गर्दी असल्यामुळे कापूस घालवणे शक्य झाले नव्हते. शेतीमाल विकून नविन हंगांमासाठी शेती दुरूस्ती खर्चास पैसे नसल्याने शेतकरी फिकरीत आहे .जुनं मध्ये पुढील वर्षाचे शेतीपिकांचे नियोजन असते सध्या कोरोणाच्या वाढत्या परिस्थितीत शेतकरी कठीन आडचनीत येत आहेत .
कुंभार पिंपळगाव सीसीआय कापुस खरेदी केंद्र हे तात्काळ सुरू करण्यात यावे सध्या कोरोना विषाणू आजाराची उद्भवलेली परिस्थितीने देशभरात थैमान घातले आहे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग च्या आदेशाचे पालन करत हे सिसिआय कापुस खरेदी केंद्र व सोयाबीन ,तुर हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावी शेतकरी संघर्ष समितीचे तालुका आध्यक्ष डॉ.रमेश तारगे ,अशोक जाधव यांनी जिल्हा आधिका-यांन कडे निवेदना मार्फत केली आहे तशी परिसरातील- ऊकडगाव गुंज कुं.पिपळगाव ,मुर्ती ,लिंबी ,धामणगाव ,जांबसमर्थ ,घाणेगावसह आदि गावतुन संजय ज्ञानोबा तौर, गणेश भगवानराव तौर, काकासाहेब पंढरीनाथ तौर, रुस्तुम सुंदर पवार राजेंद्र रामचंद्र तौर, लिंबाजी रंगनाथ तायडे ,गुंज येथील शेतकरी रोहिदास किसन डोईफोडे ,गोकुळ पंचलोटे, आसाराम वामनराव तौर, संदिपान भोसले ,,अनिल तौर , सुधाकरराव देशमुख , श्रीमंत तसनुसे, भगवान चांदगुडे ,आसाराम मुळे आदी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे
Leave a comment