जालना,
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी, चेह-यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंस पाळणे गरजेचे असल्याने याबाबीचे पालन व्हावे यासाठी गैरकृत्य करणा-या व्यक्तीविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
सार्वजनिक स्थळी रस्ते,बाजार,रुग्णालय,कार्यालय इ. ठिकाणी थुंकल्याचे प्रथम आढळल्यास 1000 रुपये दंड, सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पुर्ण झाकलेले नसल्यास 500 रुपये दंड, दुकानावर, फळ, भाजीपाला विक्रेते सर्व जीवनाश्यक वस्तू विक्रेते इ. व ग्राहक यांनी सोशल डिस्टटिंग न राखणे, दोन ग्राहकामध्ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे, विक्रेत्यानं मार्किंग न करणे यासाठी ग्राहक,व्यक्तीस 200 रुपये तर आस्थापना मालक, दुकानदार, विक्रेता यांना 2000 रुपये दंड, सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इ. ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास 1000 रुपये दंड, एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तीक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा, औषधी इ. घेवून जात असल्याची बतावणी करुन अनावश्यक फिरत असल्यास 100 रुपये दंड वरील दंड प्रथम गैरकृत्य करतांना आढल्यास करण्यात येईल. त्याचप्रमाणे दुस-यांदा गैरकृत्य करतांना आढल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.
Leave a comment