जालना –
शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या तेजस्वीनी पेट्रोपंप चालकाने बेकायदेशीर इंधन पुरवठा केल्यामुळे कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जालना शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या तेजस्वीनी पेट्रोपंप चालकाने दि. 25 मार्च ते 14 एप्रिल, 2020 या कालावधीत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू असतानासुद्धा अत्यावश्यक सेवा नसलेल्या वाहन चालकांना कॅन व बाटलीमध्ये बेकायदेशीर इंधन पुरवठा केल्याने जिल्हाधिकार रवींद्र बिनवडे यांच्या आदेशान्वये परवाना धारकाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश देऊन अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. याप्रकरणामध्ये दि. 10 एप्रिल, 2020 रोजी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 188, 269, 270,34 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) व साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा तालुक्यातील आकणी येथील 60 वर्षीय महिलेला दि. 8 एप्रिल, 2020 रोजी धाप लागत असल्या कारणाने जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे भरती करण्यात आले होते. सदरील महिलेच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी 9 एप्रिल रोजी पाठविण्यात आला होता. तपासणी अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला आहे. महिलेला फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यानुसार उपचार सुरु होते. तसेच महिलेच्या किडनीवर सुज येऊन ईतर अवयव निकामी होत होते. महिलेला दम्याचाही बऱ्याच दिवसापासुन त्रास होता. औषधोपचार करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे दि. 14 एप्रिल, 2020 रोजी पाठविण्यात आले होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखल झाल्यानंतर महिला मृत असल्याचे आढळुन आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
सध्या सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खीनगर येथील कोरोनाबाधित 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन त्यांच्या स्वॅबचे नमुने दि. 15 एप्रिल, 2020 रोजी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच सारी (Serve Acute Respiratory Illness) या आजारानेग्रस्त दानाबाजार परिसरातील 40 वर्षीय महिला महिला जिल्हा रुग्णालयात दाखल असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 552 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 97 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 359 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 09 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 437 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 423, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 77, एकुण प्रलंबित नमुने-10 तर एकुण 262 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 05, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 92 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 08, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-01, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 97, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 216 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Leave a comment