औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेवून, सुरक्षिततेचे नियम पाळून नवभारत शिक्षण संस्था संचलित शिशुविकास केंद्र सुपारी शाळेमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे हितचिंतक आतिश भगवान जोजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मंदाकिनी डबीर व संस्थेच्या सदस्या मीना बोरसे यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा डोंगरे, सचिव संदीप वरधावे,उपाध्यक्षा अलका पाठक,कोषाध्यक्षा अपर्णा धर्माधिकारी व प्रशासकीय अधिकारी संजीवनी वरधावे यांनी कार्यक्रमासाठी ऑनलाईन शुभेच्छा पाठवल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा कोल्हे यांनी, परिचय अंजली नाईक यांनी,मराठवाडा मुक्तीदिनाची माहिती संध्या सोळुंके यांनी तर साधना साबळे यांनी आभार मानले.
Leave a comment