औरंगाबाद । वार्ताहर
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई - पीक प्रकल्प पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, उपविभागीय अधीकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय कृषी अधीकारी पी.आर.जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे,जिल्हा तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव, आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ई- पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशन द्वारे पिकांची नोंदी घेण्याचे शेती बांधावर प्रात्यक्षिक करून कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई- पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले,तसेच बिल्डा गावचे तलाठी यांनी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत ई- पीक पाहणी मोबाईल अप्लिकेश मध्ये उभ्या पिकांची माहीत भरून फ़ोटो अपलोड केले.
Leave a comment