ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; आदर्श नगर वसाहतीतील नागरिकांचा आरोप
शिवना । वार्ताहर
सिल्लोड तालुक्याती शिवना येथील आदर्श नगर प्लॉट भागात घाणीचे साम्राज्य पसरले असुन गटार ब्लॉक झाल्याने गटारीमधून पाणी रस्त्यावर आले आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून नागरीकांना याचा पाण्यातून रहदारी करत ये-जा करावी लागते. परिणामी स्थानिक रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. गटारींची वेळोवेळी सफाई होत नाही, सांडपाण्याचा निचरा होत आहे. परिणामी गटारी साचुन राहतात. त्यामुळे दुर्गधी पसरुन डास, मच्छर आदींची उत्पती होत असल्याने साथीचे आजार वाढीस लागुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळाबली आहे.
येथील प्रभाग क्रमांक 3 मधील आदर्श नगर प्लॉट भागात स्वच्छतेचे धिंडवणे निघाले असुन लोहार गल्लीतील गटारी तुंडूब भरल्याने गटारींचे पाणी पार रस्त्यावर साचु लागले आहे. अशा दुर्गंधीयुक्त पाण्यातुन लहानमुले, महिला, वयोवृध्दांना मार्गक्रणम करावे लागत आहे. तर रिमझिम पाऊसाने सुद्धा अनेकांच्या घरात गटारीचे पाणी शिरत आहे. यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वारंवार समस्या मांडुनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप रहिवाशी रमेश मानकर, उत्तम जगताप, रइखॉ पठाण, भिकनशेठ सिकलकर, तेजराव मानकर, किरण मानकर, शारदा बोर्डे, शांताबाई मानकर, छायाबाई मानकर, द्रौपदाबाई मानकर, सागर मानकर, गयाबाई सोनवणे, छगन शेजूळ, सचिन मानकर, समींद्राबाई मानकर, राहुल मानकर, रहीम पठाण, सुरेश मानकर आदिनी केला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर गटारिचे पाणी साचुन रहदारीस अळथळा होत असेल तर स्थानिक रहिवाश्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागते याची प्रचिती आदर्श नगर मधून येत आहे.
आदर्श नगर वसाहत ही नव्याने नावारूपास आली आहे. या ठिकाणी नळ कनेक्शन, पथदिवे, रस्त्याचे काम आम्ही मार्गि लावले आहेत. गटारी नाल्या सर्वच कामे व सुविधा प्रलंबित आहेत.
अरूण काळे - माजी उपसरपंच शिवना
आम्ही अनेक निवेदने देऊनही यापूर्वीची ग्रामपंचायत व आताचे ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात काहीच फरक नाही अनेकदा ग्रामपंचायतीचे मेंमबर पकडुन या वस्तीची झालेली दुर्दशा दाखविली व मुलेबाळ महिलांनी रडुन रडुनही समस्या सांगितल्या पण आश्वासना पलिकडे काहीच मिळाले नाही.
त्यामुळे आता कुणाकडे दुहार मांडावी काही कळेना.
- सुरेश मानकर स्थानिक रहिवाशी
याच वस्तीच्या पाण्याच्या समस्येबाबत सरपंचांना धक्काबुक्की होण्याचा प्रकार होऊनही त्यांनी यावर उपाययोजना केली नव्हती.ग्रामपंचायत सदस्य सचिन राऊत यांनी स्वखर्चातून येथे काही मुरुमाने भराव करण्याचा प्रयत्न केला होता तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्तच होते आणि शेवटी आज नेहमीप्रमाणे घरांमध्ये पाणी शिरुन गोरगरिबांचे संसार अक्षरशः पाण्यात बुडाले ज्यास ग्रामपंचायत चा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे.
मी कालच प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे . ग्रामपंचायतीकडे किती निधी आला होता आणि किती निधी बाकी आहे याची पुर्ण माहीती संपादीत करुन उद्याच आदर्श नगर भागातील पाण्याची वीलेवाट लावतो
किशोर जगताप - ग्रामपंचायत प्रशासक शिवना
Leave a comment