महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस पडला अडवा
विहामांडवा वार्ताहर
महिना भरात कारखान्याला जाणारा असंख्य हेक्टरावरील उभा असलेला ऊस जोरदार वादळी वार्याच्या तडाख्यामुळे भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत.नवगाव ता.पैठण भागात रविवारी ता.6 दुपारी वादळी वार्याचा तडाखा बसल्याने ऊसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे.दरम्यान या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात यावी यासाठी पंचायत समितीचे सदस्य रशिदाबी शेख, ग्रामपंचायत सदस्य सत्तारसेठ व डाँ.शरीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी सोमवारी ता.7 दुपारी तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.
तालुक्यातील नवगाव,तुळजापूर,टाकळी अंबड,हिरडपुरी,आपेगाव, विहामांडवा आदी. परिसरात रविवारी (ता.6) दुपारी साडेचार वाजता जोराचा वादळी वा-यासह तुरळक झाला. या वादळी वार्याने उभा असलेला ऊस जमिनीलगत आडवा पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.रविवारी( ता.6 )दुपारी तालुक्यात विविध गावात कमी, अधिक पाऊस झाला.
दरम्यान पावसासोबत जोराचा वारा सुटल्याने महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस आडवा पडला. या वा-याच्या झटक्याने काही ऊस तर मोडून व उन्मळून पडला आहे. यात शेतक-यांच्या शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे.
या वादळी पावसाने नवगाव, तुळजापूर परिसरातील बहुतांश शेतकर्यांचे ऊसाचे क्षेत्र सपाट झाले आहेत.आधी मूग गेला, सोयाबीनचे पीकही करपा आणि बुरशीने जाण्याच्या मार्गावर आहे. अशा नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेततकरी करीत आहे.
वादळी वार्यासह पावसाने ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. उसाचे पीक विंगसह विभागात ठिकठिकाणी कोसळले आहे. भुईसपाटही झाले आहे. नुकसानीमुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.
गेल्या पंधरा- विस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने रविवारी हजेरी लावल्याने एकीकडे खरिपातील कापूस तूर, बाजरी, सोयाबीन, भुईमुगासारख्या पिकांना त्याने जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले असतांनाच मात्र ऊस पिकाला त्याचा मोठा फटका बसला. सोसाट्याच्या वार्यामुळे उसाचे पीक ठिकठिकाणी कोसळले. भुईसपाटही झाले आहे. उत्पादकांचे त्यात मोठे नुकसान झाले आहे. नवगावसह तुळजापूर,हिरडापुरी,टाकळी अंबड,आपेगाव,विहामांडवा,आदी गनथडी भागात शेकडो हेक्टरवर उसाच्या पिकांकडे आर्थिक नफ्याच्या दृष्टीने पाहिले जाते. शेतकर्याचे वर्षभराचे अर्थचक्र त्यावर चालते. कबाडकष्ट करून मोठ्या उमेदीने चांगल्या पध्दतीने त्यांनी ऊस जोपासले आहे. सद्या ऊसाचे पिके 18 ते 25 कांड्यावर आहे. वाढही अपेक्षित झालेली आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून शेतकर्यांनी पिकावर लक्ष केंद्रित केल्याने ऊसाचे पिक बहरले आहे. मात्र झालेल्या वादळी वार्याच्या संकटामुळे ऊसाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच अगोदर ऊसावर हुमणी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव उसावर ठिकठिकाणी आहे. हुमणी किडीने मुळांना लक्ष्य केले आहे. तर माव्याने पानावर हल्ला केला आहे. त्याठिकाणचे पीक सहज कोसळत आहे. नुकसानीत एक प्रकारे भरच पडत आहे. दरम्यान नवगाव गणाचे पंचायत समितीचे सदस्य रशिदाबी शेख,ग्रामपंचायत समितीचे सदस्य सत्तारसेठ ,डाँ.शरीफ पठाण,हाशम पठाण,परमेश्वर डांगे,अख्तर पठाण,मुक्तार पठाण आदी.तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची भेट घेऊन नुकसाभागाचे पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
Leave a comment