तिसर्‍या दिवशीही 11373 क्युसेकने पाण्याची आवक 

पैठण । नंदकिशोर मगरे 

आशिया  खंडातील सर्वात मोठा मातीचा प्रकल्प म्हणून जायकवाडी जलाशयाकडे पाहिले जाते .हा  जलाशय पुर्ण क्षमतेने भरला असून 98.62 टक्क्यावर पाणी पातळी पोहचली आहे .त्यातच वरिल पाणलोट क्षेत्रातून येणारी आवक पहाता जायकवाडी प्रशासनाने गेल्या तिन दिवसापासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला असून सद्यस्थितीत सोळा दरवाजे उघडून एकूण 8384 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सोडला जात आहे .

गेल्या तिन दिवसापुर्वी जायकवाडी जलाशय तुडूंब भरला असल्याने वरील पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक पहाता पाटबंधारे विभागाने परवा सुरूवातीला दोन     काही  वेळाने आणखी दोन तर दि 7 रोजी गेट   क्रं  10 ,27 ,18 ,19,16,21 ,14,23,12,25,11,26 ,13,24 ,15  व 22 असे एकुण  तब्बल   सोळा दरवाजे अर्ध्या फुटाने वर करून 8384 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला आहे .तर विद्युत निर्मीती केंद्रातून 1589 ,उजवा कालवा 600 तर डाव्या कालव्यातून 800 असा विसर्ग सुरू आहे .

दरम्यान सलग दुस-या वर्षीही जायकवाडी जलाशय पुर्ण क्षमतेने भरत असून दोन वर्षात   सलग  दुस-यांदा   गेटद्वारे गोदापात्रात   पाणी सोडण्याचा योग आला आहे .यामुळे जायकवाडी जलाशयावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे .त्यातच प्रशासनाने गोदा काठच्या गावांना खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा दिला असून कोणीही गोदापात्रात उतरू नये तसेच लहान मुलावर विशेष लक्ष द्यावे असे अवाहनही यावेळी करण्यात आले आहे .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.