पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
आज दिनांक 04 सप्टेंबर 2020 रोजी प्राथमिक शाळा भैरवनाथ वाडी येथे स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. या स्वाध्याय पुस्तिका शिक्षकांनी स्वखर्चाने तयार केलेल्या असून विद्यार्थ्यांच्या योग्य व चांगल्या अध्ययनासाठी शिक्षकांनी मेहनतीने या स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर घनवट सर व त्यांचे सहकारी श्री पवनकुमार वानखडे, तसेच शिक्षण प्रेमी श्री विलास मिसाळ यांनी केंद्रप्रमुख बी.ए.दळवी सर यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला उपयुक्त अशा वर्ग निहाय स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आहेत. या स्वाध्याय पुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन नक्कीच व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे.
स्मार्टफोन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते परंतु आता या स्वाध्याय पुस्तिका आल्यामुळे मुलांचं शिकणं नक्कीच सोपं होईल अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. तसेच शिक्षकांच्या प्रयत्नांचे ही कौतुक केले. या स्वाध्याय पुस्तिका वितरण कार्यक्रमासाठी विषयतज्ञ श्री संदीप देशमुख (ग.सा.के. भोकरदन), केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री गजानन मैंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती वनिता मिसाळ, सदस्य, रतन पाटिल मिसाळ मंगेश मिसाळ, पवन मुळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a comment