कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील नालीची साफसफाई होईना
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील नाल्याची आणेक दिवसापासून साफसफाई होत नसून ,नाली वरून वहात आहे ,सहा महिन्या पुर्वीच या बाबत ग्रामसेवक व सरपंच यांना या बाबत कळवले होते .तरीही नाली काढली नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात दुर्गंधी सुटली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दवाखान्याच्या परिसरात झाडे झुडपे गवत वाढले आहे त्यामुळे दासाचा प्रादुर्भाव वाढत आहे .त्याचा त्रास रूग्णांना होत आहे. तसेच येथे दवाखान्याच्या अवारात लघुशंका केली जात आहे. त्यामुळे दवाखाना परिसरात दुर्गंधी सुटली असून येथे डुकरांचा ही वावर वाढला आहे .त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असून सध्या कोरोना विषाणू आजाराचे भयानक गंभीर परिणाम आपण पाहात आहोत ,गावागावात ग्रामपंचायत कडून दखल घेतली जात आहे. शेजारील गावात ग्रामपंचाय कडून चार-चार फवारण्या झालेल्या आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन बी.डी.ओ.अंकुश गुंजकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी ग्रामसेवक यांना प्राथमीक आरोग्य केंद्र परिसर धूर फवारणी व नाल्या सफाई करून गावात स्वच्छता करण्याचे आदेश दिले केले होते परंतु आदेश देऊन आठवडा उलटला तरी याकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत असून बी. डि. ओ .ने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जाते, प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामसेवकांना समक्ष तोंडी सांगूनही वरिष्ठाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
Leave a comment